सुखवाडी ग्राम पंचायत

आदिलशाही साम्राज्यकाळात बंडखोर सरदार, सेनापती आदिलशहाला सोडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सामील झाले.  आदिलशहाकडून जिवितास धोका असल्याने लपत–छपत हिंडत होते. त्यावेळी आसरा म्हणून या भुमीत वसाहत करु लागले.  त्यावेळी निर्भीड अरण्य, कृष्णामाईचा शांत प्रवाह परिसर वनराईने नटलेला अशा भूमीत थोर सिध्द पुरुष सद्गुरु भारती महाराजांची समाधी स्थळ होते असे सांगतात की, सद्गुरु भारती महाराज कृष्णाकाठावरुन साधना करीत भिलवडी येथे आले आणि भिलवडीपासून दक्षिणेस 6 कि.मी असलेल्या एका निर्जन ठिकाणी तपश्चर्येस बसले त्यांचा सेवेकरी वर्ग भिलवडीचे पाटील घराणे होते.  त्यांची आजही श्रध्दा या सद्गुरुवर आहे. त्यांच्या अनुषंगाने हळूहळू वसाहत वाढत गेली.  रोगराई नाही कोणत्याही प्रकारचे भय नाही. कृष्णेचे थंडगार पाणी निसर्ग यामुळे सौख्य व समृध्दी पुरेपुर होती. म्हणून या गावास सुखवाडी असे संबोधण्यात येवू लागले.