धार्मिक सांस्कृतिक

–धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक उत्सव–

ग्रामदैवत लक्ष्मी देवीची यात्रा– श्री. लक्ष्मी देवीची यात्रा वैशाख महिन्यात अक्षय तृतीयेच्या पाचव्या दिवशी यात्रा संपन्न होते. चैत्र महिना संपलेला असतो शेतीची कामे ही उरकलेली असल्यो शेतकरी निवांत असतो. अशावेळी ही यात्रा उत्सव येतो. यात्रेचे कार्यक्रम व वर्गणीबद्दल गावकयांची बैठक होते. यात्रा कमिटीची स्थापना होते संपूर्ण यात्रेची जबाबदारी यात्रा कमिटीकडे असते. गावातील नोकरी निमित्त बाहेरगावी गेलेले लोक पाहुणे– यात्रेनिमित्त एकत्र येतात. कुस्त्या, सायकल धावणे, पोहण्याच्या शर्यती असतात. तसेच कलपथक तमाशा, धनगरी ओव्या अशा कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते. यात्रेदिवशी सायंकाळी देवीला पुरणपोळीचा नैवेदय केला जातो. रात्री पालखी निघते.

पालखी मिरवणूकीमध्ये लहान मुले, स्त्रिया, पुरुष्, वृध्द सहभाग घेतात. पालखीसमोर धनगरी ढोलांचा गजर सुरु असतो. शोभेच्या दारुची आतषबाजी सुरु असते. पालखी सोहळयात सहभागी लोक भंडायाने न्हावून निघतात. मिरवणूक संपल्यानंतर लोक घरी जावून गोडधोड जेवण करुन कलापथक पाहणेसाठी शाळेच्या मैदानात जमतात व शांततेचा कार्यक्रम पार पाडला जातो. गणेशोत्सव हा सर्वांना आनंद देणारा ऐक्य भावना निर्माण करणारा सार्वजनिक उत्सव असतो.

गावातील सर्व तरुण मंडळे एकत्र येवून एकच गणपती बसवतात तेव्हा भजन, किर्तन, प्रवचन, व्याख्यान आयोजित केले जातात. तसेच विठ्ठल मंदीरात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. त्यानिमित्त अखंड हरिनाम, सप्ताह आयोजीत केला जातो. त्यामध्ये प्रवचन, पारायण, किर्तन यांचा समावेश असतो. दत्तजयंती, हनुमान जयंती, सेनामहाराज पुण्यतिथी , दररोज हरिपाठ इ. उत्साहाने साजरे केले जातात. 15 ऑगस्ट व 26 जानेवारी हे राष्ट्रीय सण मोठया उत्साहाने साजरे केले जातात. या दिवशी शाळेतील मुलांना गणवेष, खावू वाटप केले जातात. विद्यार्थी विविध गुधदर्शीचे कार्यक्रम करतात.