मिळालेले पुरस्कार

पुरस्कार– गावाने 2007–08 वर्षी महात्मा गांधी तंटामुक्त अभियान व निर्मलग्राम अभियान उत्कृष्ट प्रकारे राबविले आहे. गावातील तंटे गावातच मिटवले जातात. त्यामुळे गावात ऎय व शांतता निर्माण झाली आहे. दखलपात्र गुन्हा एकही घडलेला नाही. त्याचप्रविष्ठ तंटे आपापसात मिटवण्यात आले त्यामुळे पलूस तालुक्यात तंटामुकत अभियानात भाग घेतलेली एकूण 39 गावांपैकी 12 गावे तंटामुक्त झाली पैकी सुखवाडी गाव हे एक आहे. गावास शासनाचा 2 लाख रुपयाचा पुरस्कार मिळाला. एक गाव एक गणपती स्पर्धेत गावाने भाग घेतला व तो यशस्वीपणे राबवण्यात येत आहे. तसेच निर्मलग्राम अभियानात भाग घेतला आहे. सर्व ग्रामस्थांनी अपले गाव निर्मल स्वच्द करण्यासाठी खुप परिश्रम घेतले. सभा, व्याख्याने, प्रवचने याद्वारे लोकजागृती करण्यात आली. रस्त्यांची साफसफाई, गटार स्वच्छता कचरा, सांडपाण्याची विल्हेवाट लावून घर तेथे शौचालय बांधण्यात आले निर्मलग्राम कमिटी तर्फे गावाची पाहणी व परिक्षण ही झाले. त्यामध्ये सुखवाडी गावास निर्मलग्रामचा पुरस्कार मिळाला हे आम्हा ग्रामस्थांना अभिमानास्पद व गौरवास्पद आहे.