इतिहास

इतिहास–

  • भिलवडीपासून दक्षिणेस 6 कि.मी अंतरावर सुखवाडी गाव वसले आहे. गावाच्या दक्षिणेस कृष्णानदी संथ वाहते. शेजारीच 2 कि.मी. अंतरावर रघुनाथ स्वामींची समाधी आहे. पश्चिमेस चोपडेवाडी व पूर्वेस ब्रम्हनाळ ही पंचक्रोशीतील गावे आहेत. गावात जगताप, यादव, गायकवाड, कदम, पाटील अशी कुटुंबे आहेत. गावात पुर्वी मुलकी पाटीलकी असायची भिलवडीचे पाटील घराणे बारा वाडयांची पाटीलकी पहात होते. सर्वत्र आदिलशहाची सत्ता होती. सर्वत्र त्याचा दबदबा असायचा. गव लोकसंख्येने अतिशय विरळ असल्यामुळे कोणत्याही सुखसुविधा गावात नव्हत्या. तरीही गावातील सर्व कुटुंबे गुण्या–गोविंदाने एकत्र राहत होती बाराही महीने शेतीव्यवसाय करुन आपला उदरनिर्वाह चालवतात. शेती हा मुख्य व्यवसाय आहे कृष्णा नदीला पावसाळयात सतत पुर येत असे. पुराचे पाणी गावात येत असे. त्यामुळे शेतीचे नुकसान बरेच होत होते. आता पुरनियंत्रणामुळे नदीच्या पुराला आळा बसलेला आहे. पूर्वी भिलवडी मुख्य ग्रामपंचायत होती.
  • बारा वाडया व भिलवडी मिळून ग्रुप ग्रामपंचायतमाफ‍र्त कारभार पाहिला जात हो.ता आता प्रशासनाने सोयींसाठी सर्व वाडयांना स्वतंत्र ग्रामपंचायती दिल्या आहेत. सन 1965 पासून सुखवाडीमध्ये ग्रामपंचायतीची स्थापना झाली. गावची लोकसंख्या 1291 असून गावाला वेस आहे. बाजारहाट करण्यासाठी सांगली, भिलवडी या ठिकाणाहून मालाची खरेदी–विक्री केली जाते.