सुविधा

पायाभूत सुविधा–

  1. गावातील रस्त्यांचे खडीकरण झाले आहे.
  2. रस्त्याच्या बाजूने यशवंत योजनेतून सांडपाण्याची सोयीसाठी गटार योजना राबविली आहे.
  3. रस्त्यावर विजेच्या खांबाची सोय आहे.
  4. लोकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ब्रम्हनाळहून पाणी आणले आहे. ते पाणी गावतील उंचावर असणाया टाकीत सोडले जाते. त्यानंतर गावाला योग्य दाबाने नियमित पाणीपुरवठा केला जातो.
  5. गावात सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत.
  6. गावातून कृष्णा नदीपलिकडे जाण्यासाठी होडीची सोय आहे. त्यामुळे विद्यार्थी, नोकरवर्ग यांना सांगली पुणे–मुंबईला जाण्याची सोय होते.
  7. भिलवडी गाव आठवडा बाजारस्थळ आहे. प्रत्येक रविवारी भरतो.