शैक्षणिक सुविधा

शैक्षणिक सुविधा–

  1. गावात फक्त 1.ली ते 7.वी पर्यंत प्राथमिक शाळा आहे. शाळेचे नियोजन जिल्हा परिषदेमाफ‍र्त केले जाते. शाळेची इमारत जुन्या पध्दतीची कौलारु व दगडी बांधकामाची आहे. तसेच दोन खोल्या सिमेंटपत्रा असलेल्या आहेत. पुरेशा प्रमाणात खेळाचे मैदान आहे. चौथी व सातवी शिष्यवृत्ती परिक्षेसाठी विद्याथ्र्यांकडून तयारी करुन घेण्यासाठी शिक्षक खुप परिश्रम घेतात त्यामुळे शाळेचा गुणवत्ता दर्जा वाढलेला आहे. इ. 7.वी नंतर विद्याथ्र्यांची पुढील शिक्षण ब्रम्हनाळ येथे आहे.
  2. विद्यालयीन शिक्षण भिलवडी सांगली येथे आहे. गावात शैक्षणिक, अभियांत्रिकी, प्रशासकीय इ. क्षेत्रात बरेच लोक कार्यरत आहेत. गाव लहानसे आहे परंतु सरस्वतीच्या वरदहस्त गावावर आहे. यामुळे गावात पदवीधरांची संख्या भरपूर आहे. पी.एच.डी मिळविणारे तसेच परदेशी शिक्षण घेणारे गुणी विद्यार्थी आहेत. डॉक्टर, इंजिनियर, प्रा. शिक्षण, माध्यमिक शिक्षण, व्यवसाय करणारे बरेच लोक आहेत. तसेच स्वातंय सैनिक, सैनिक, वकील इ. लोक गावात आहेत याचाच अर्थ सुखवाडी गावातील विद्यार्थी लोक प्रत्येक क्षेत्रात चमकत आहेत कार्यरत आहेत.