जलस्त्रोत

जलस्त्रोत–

  • गावच्या दक्षिणेकडून कृष्णा नदी वाहते कृष्णानदी म्हणजे आमच्या गावचे एक दैवतच आहे. त्यामुळे शेतीच्या बाबतीत गाव सुखी संपन्न आहे. शेतीस पाणी लिफ्ट इरिगेशन तसेच इलेक्ट्रिक पंपद्वारे दिले जाते. गावातील सर्व जमिन बागायती आहे त्यामुळे बारमाही पिके घेतली जातात. गावातील लोकांची पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेने नळ ब्रम्हनाल येथे लिफ्टद्वारे पाटी उचलून पाणी शुध्दीकरण योजना स्वतंत्र राबवली आहे. तेथून पाईपलाईनद्वारे गावात पाणी आणले आहे. त्यासाठी गावात 50,000 क्षमतेची टाकी बांधली असून त्यातून गावात पाणीपुरवठा केला जातो.