प्राणीसंपदा

प्राणीसंपदा–

  • गावचा मुख्य व्यवसाय शेती आहे. या व्यवसायास पुरक जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय केला जातो. शिवाय महाराष्ट्रात अग्रेसर असलेली चितळे दूध डेअरी जवळच असल्याने या व्यवसायास अधिक उत्तेजन मिळाले आहे. गावात विविध जातीच्या गायी–म्हैशी आहेत. दूध संकलनासाठी गावात चितळे डेअरी आहे. 15 दिवसाला दूधाचे पगार असल्यामुळे शेतकरी या व्यवसायाकडे मोठया संख्येने वळला आहे. बेरोजगार तरुण या व्यवसायाकडे मोठया प्रमाणात वळला आहे.